बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: बुधवार, 8 जून 2022 (07:48 IST)

अपक्ष आमदारांचं बळ मिळवण्यात महाविकास आघाडीला यश

uddhav
राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. ट्रायडंट हॉटेलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत तीनही पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यासह लहान पक्ष आणि अपक्ष मिळून 165 आमदार उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना सरकारला पाठिंबा दिलेले समाजवादी पार्टीचे 2 आणि बहुजन विकास आगाडीचे 3 आमदार बैठकीला गैरहजर होते. तर त्यावेळी भाजपरोबर असलेल्या गीता जैन आणि विनोद अग्रवाल हे दोन अपक्ष महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते. (mahavikas aghadi establishing success in getting the support of independent mlas)
 
mahavikas aghadi establishing success in getting the support of independent mlas
राज्यसभेसाठी 29 आमदार किंगमेकर; BJP नं बाजी मारलीचं तर आघाडीत बिघाडी पक्की
राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचं जोरदार शक्तीप्रदर्शन पहायला मिळाल. ट्रायडंटवर मुख्यमंत्री, शरद पवारांच्या उपस्थिती बैठक पार पडली. बैठकीला मविआ, लहान पक्ष, अपक्ष मिळून 170 आमदार उपस्थित होते. सरकारला पाठिंबा दिलेले सपाचे 2, बविआचे 3 आमदार गैरहजर होते. भाजपला पाठिंबा देणारे दोन अपक्ष महाविकास आघाडीच्या गोटात पहायला मिळाल्याने सर्वांना आश्चर्यांचा धक्का बसला आहे.
 
महाविकासआघाडीला पाठिंबा असणाऱ्या 12 आमदारांची नावे
 
विनोद निकोले
नरेंद्र बोंडेकर
किशोर जोरगेवार
अशिष जयस्वाल
राजकुमार पटेल
विनोद अग्रवाल
संजय मामा शिंदे
गिता जैन
चंद्रकांत पाटील
शामसुंदर शिंगे
देवेंद्र भुयार
मंजुळा गावित