बाजारातील विकल्या गेलेल्या घोड्यांची यादी आमच्याकडे
मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत महाविकास आघाडीतील कोणतेही मत फुटले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तर अपक्षांनी दगबाजी केली. बाजारातील विकल्या गेलेल्या घोड्यांची यादी आमच्याकडे आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
संजय राऊत म्हणाले की, घोडेबाजारामध्ये जी लोकं उभी होती. त्यांची सहा-सात मते आम्हाला मिळाली नाहीत. आमचे जे घटक पक्ष आहेत त्यांचे एकही मत फुटले नाही. कोणी शब्द देऊन दगाबाजी केली आहे त्यांची नावे आमच्याकडे आहेत. वसईचे हितेंद्र ठाकूर यांची तीन मते आम्हाला मिळाली नाही. देवेंद्र भुयार यांची मदत देखील आम्हाला मिळाली नाहीत, असे उघडपणे त्यांनी सांगितले.
आम्ही व्यापार केला नाही. त्यांना पहाटेची सवय आहे. त्यांचा पहाटेचा उपक्रम होता त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असा म्हणत राऊतांनी भाजपच्या पहाटेच्या शपथविधीवरुन टोला लगावला आहे.
तर, राज्यसभेत भाजपच्या विजयानंतर आता महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचा विधाने राजकीय पटलावरुन केली जात आहेत. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, घोडे बाजारातील या घोड्यांमुळे कुठल्याही सरकारला धोका होत नाही. घोडे येथे असतात तसेच तिथे देखील असतील जिथे हरभरे टाकतील तिथे जातात. गेली अडीच वर्ष आम्ही काऊंटडाऊन ऐकतच आहोत, असे त्यांनी सांगितले आहे.
राज्यसभेत अतिरीक्त मतांच्या जोरावर संजय पवार यांना शिवसेनेने राज्यसभेच्या रिंगणात उतरविले होते. परंतु, पवार यांचा पराभव झाल्याने शिवसेनेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. यावर संजय राऊत म्हंटले की, 42 नक्कीच ते धाडस होतं आमचा हा आकडा होता. परंतु, समोरच्याने ताकद व केंद्रीय तपास यंत्रणांचा ताकद वापरून घोडेबाजार केला. महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासला. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची नोंद ठाकरे सरकार देखील घेत आहे. मी माझ्या पक्षाने दिलेल्या 42 मतांवर लढत होतो. त्यातलं एक मत माझं बाद केलंकाही लोक माझ्या मतांवर डोळा ठेवून होते. पण तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला, असेदेखील त्यांनी सांगितले आहे.