गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By
Last Updated : बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (18:56 IST)

Raksha Bandhan Wishes In Marathi 2022 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे
कितीही भांडलो, रुसलो, फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे
यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा श्रावण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण..
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे…
भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
 
चंद्राला चंदन
देवाला वंदन
भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे
रक्षाबंधन
 
भाऊ हा शब्द कधी उलटा वाचलात की “ऊभा”
जो चांगल्या आणि वाईट परिस्थितीत
आपल्या पाठीशी खंबीरपणे
ऊभा असतो तोच आपला भाऊ..!
 
पवित्र प्रेमाचं अतूट नातं,
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
 
एक नातं विश्वासाचं एक नातं प्रेमाचं,
रक्षाबंधन भावा बहिणीच्या पवित्र
नात्याच्या हार्दिक शुभेच्या..!
 
सगळा आनंद सगळं सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरं,
सगळं ऐश्वर्य तुला मिळू दे…
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला
एक नवा उजाळा देऊ दे…
 
राखी धागा नाही
हा नुसता विश्वास तुझ्या माझ्यातला,
आयुष्यात कुठल्याही क्षणी..
कुठल्याही वळणावर..
कुठल्याही संकटात..
हक्कानं तुलाच हाक मारणार
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्या.
 
कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं
खूप खूप गोड.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
 
दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे…
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
 
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
असेल हातात हात,
अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ,
माझ्या जीवनाचा हरेक क्षण
तुझ्या रक्षणासाठी सरलेला असेल,
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत
विश्वासच तो सदैव उरलेला असेल…
रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!!
 
जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ
नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस
रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा
 
बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
ओवाळीते प्रेमाने,उजळुनी दीप-ज्योती,
रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
 
बहिण म्हणजे बालपणातील सर्व 
सुंदर आठवणींचे प्रतिबिंब असते.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !
 
रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
 
बहिणी पेक्षा चांगली मैत्रीण कोणी 
असूच शकत नाही आणि ताई तुझ्या 
पेक्षा चांगली बहीणया जगात नाही. 
माझ्या गोड ताईला 
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
 
रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा
वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा
यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!