रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. रक्षाबंधन 2024
Written By
Last Updated : सोमवार, 19 ऑगस्ट 2024 (09:01 IST)

Raksha Bandhan Rakhi Muhurat 2024: रक्षाबंधनाला राखी बांधण्याची शुभ मुहूर्त कोणता?

रक्षाबंधन शुभ मुहूर्त 
रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षी रक्षाबंधन हा सण 19 ऑगस्ट 2024, सोमवार पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाईल. या दिवशी भद्रा पाताळात निवास करेल. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, भद्रा पृथ्वीवरील असेल तरच त्याचे नियम वैध आहेत. भद्रा जिथे राहते तिथे तिचा पूर्णपणे त्याग करावा असे काही धर्मग्रंथात सांगितले आहे.
 
रक्षाबंधनला भद्रा काळ :-
रक्षाबंधन भद्रा समाप्ती वेळ- दुपारी 01:30 नंतर.
रक्षाबंधन भद्रा पूंछ- सकाळी 09:51 ते 10:56 पर्यंत.
रक्षाबंधन भद्रा मुख – सकाळी 10:56 ते दुपारी 12:37 पर्यंत.
 
रक्षाबंधनला राखी बांधण्याची शुभ मुहूर्त-
राखी बांधण्याची वेळ: दुपारी 01:34 ते 09:07 पर्यंत.
रक्षाबंधनाचा दुपारचा मुहूर्त: 01:42 ते दुपारी 04:19 पर्यंत.
रक्षाबंधन प्रदोष मुहूर्त: 06:56 ते 09:07 पर्यंत.
 
ज्योतिषशास्त्रानुसार :-
शुभ वेळ: दुपारी 2:00 ते 6:55 पर्यंत.
सर्वोत्तम वेळ: दुपारी 3:30 ते 6:45 पर्यंत.
पंचक : सायंकाळी 7:00 पासून पंचक सुरू होईल. त्यामुळे संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वी राखी बांधावी.