भावाला बांधा 5 पवित्र वस्तूंनी बनवलेली वैदिक राखी
रक्षाबंधन हे सगळ्या भाऊ- बहिणींसाठी विशेष सण आहे. भावाच्या सुख-समृद्धीसाठी हा सण वैदिक परंपरेनुसार साजरा करायला हवा. या वैदिक परंपरेत रक्षा सूत्र अर्थात राखीचं खूप महत्त्व आहे. पाहू हे रक्षा सूत्र कसं तयार केले जातं:
हे रक्षा सूत्र तयार करण्यासाठी 5 वस्तूंची आवश्यकता आहे:
1 दूर्वा
2 अक्षता
3 केशर
4 चंदन
5 मोहर्या
या पाची वस्तू रेशीम कपड्यात बांधून त्याला शिवून घ्या. ही राखी शुभ मुर्हूतावर आपल्या भावाला बांधा.
पुढे वाचा... काय आहे या राखीचं महत्त्व
दूर्वा
असे मानले आहे की ज्याप्रकारे दूर्वा लवकर वाढते त्याप्रकारे भावाच्या संपत्ती- संतती आणि सद्गुणांमध्ये वृद्धी व्हावी. याव्यतिरिक्त गणपतीलाही दूर्वा प्रिय असल्यामुळे हे सूत्र भावाच्या जीवनातील विघ्न दूर करतं.
अक्षता
अक्षता म्हणजे दीर्घायुषी आणि यशस्वी होण्याची कामना.
केशर
यामागे केशरच्या प्रकृतीनुरूप तेजस्वी राहण्याची कामना असते.
चंदन
चंदन शीतल आणि सुवासिक असतं. याअर्थी भावाच्या जीवनात शांती असावी आणि त्याचं जीवन पवित्र आणि सुवासिक राहव अशी मनोकामना असते.
मोहर्या
मोहर्यांची प्रकृती तापट असते. याअर्थी समाजातील दुर्गुणांना सामोरा जाण्यासाठी सज्ज होणे आवश्यक आहे. याने भावाला दृष्टही लागत नाही.
ही राखी तयार करून सर्वात आधी देवाला अर्पण करावी. त्यानंतर हे सूत्र बहिणीला भावाला, आईने मुलांना बांधायला हवं. याने परिवारात आनंद नांदतो.
हे सूत्र बांधताना या मंत्राचा जप करावा...
येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:।
तेन त्वां अभिबन्धामि रक्षे मा चल मा चल ।।
सूत्र बांधल्यानंतर तोंड गोड करवावे.