बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By वेबदुनिया|

रामनवमी व्रत कसे करावे?

चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी असे म्हटले जाते. या दिवशी कौसल्येने भगवान श्रीरामाला जन्म दिला होता. भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रामनवमीचे एक व्रतही आहे. भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी, गुरूवार, पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता. विशेष म्हणजे, महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहण्यास सुरवात केली होती. 
रामनवमी व्रत कसे करावे?

WD

रामनवमी व्रत कसे करावे?

* व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळीच लवकर स्नान आटोपून श्रीरामाचे नामस्मरण करावे.
* दुसर्‍या दिवशी (चैत्र शुक्ल नवमीला) ब्रह्म मुहर्तात ऊठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत.
* त्यानंतर गोमूत्र, शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे.
* 'उपोष्य नवमी त्व यामेष्वष्टसु राघव| तेन प्रीतो भव त्वं भो संसारात् त्राहि मां हरे||' या मंत्राने ईश्वराप्रती व्रत भावना प्रकट करावी.
* त्यानंतर, 'मम भगवत्प्रीतिकामनया (वामुकफलप्राप्तिकामनया) रामजयंतीव्रतमहं करिष्ये' हा संकल्प करून काम- क्रोध-लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन व्रत करावे.
* मंदिर किंवा घराला तोरण आणि पताका लावून सुशोभित करावे.
* घराच्या उत्तर भागात रंगीत मंडप टाकून त्यात सर्वतोभद्रमंडलाची रचना करून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक कलश स्थापन करावा.
* कलशावर रामपंचायतन (त्यामध्ये राम-सीता, दोन्ही बाजूला भरत आणि शत्रुघ्न, लक्ष्मण आणि पदचरणी हनुमानाच्या सोन्याच्या मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी आणि त्यांची पूजा करावी.
* त्यानंतर विधीपूर्वक संपूर्ण पूजा करा.

रामनवमीच्या दिवशी काय करावे?


WD

रामनवमीच्या दिवशी काय करावे?

* या दिवशी संपूर्ण आठ प्रहर उपवास ठेवला पाहिजे.
* दिवसभर ईश्वराचे भजन-स्मरण, स्तोत्र-पाठ, हवन आणि उत्सव साजरा करावा.
* तसेच रामायण वाचणे आवश्यक आहे.
* या दिवशी मर्यादा पुरूषोत्तमाचे आदर्श अंगीकारण्याचा संकल्प करावा.
* प्रभु श्रीरामचंद्र चरित्र-श्रवण करून जागरण करा.
* दुसर्‍या दिवशी (दशमीला) पारायण करून व्रत सोडावे.
* गरीब आणि ब्राम्हणांना दान करून त्यांना जेवू घालावे.
WD

रामनवमी व्रताचे फळ

* हे व्रत नित्य, नैमित्तिक आणि काम्य अशा तीन प्रकारचे आहे. नित्य होण्याबरोबर याला निष्काम भावना ठेवून आयुष्‍यभर केले तर आयुष्य आनंदमय होते.
* एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्याचे यथेच्छ फळ मिळते.
* विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ मिळते.