बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. मंदीच्या विळख्यात
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्‍ली , रविवार, 7 डिसेंबर 2008 (17:42 IST)

मंदीवर सरकारची 20 हजार कोटींची मलमपट्टी

जागतिक मंदीच्‍या विळख्‍यात अडकलेल्‍या भारतीय अर्थव्‍यवस्‍थेला सावरण्‍यासाठी केंद्र सरकारने 20 हजार कोटी रुपयांच्‍या पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजअंतर्गत लहान उद्योगांना अनेक सवलती देण्‍यात येणार असून उद्योग सुरू करण्‍यासाठी 1 कोठी रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. या शिवाय सेंट्रल वॅटमध्‍ये 4 टक्के सवलती दिल्‍या जाणार आहेत.

सरकारने 5 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंतच्‍या गृहकर्जाच्‍या व्‍यवजदरातही खास सुट देण्‍याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय निर्यातीला प्राधान्‍य देण्‍यासाठी 350 कोटी रुपयांची तरतुद करण्‍यात आली आहे.