अखंड महाराष्ट्र ही काळाची गरज : शरद पवार
अखंड महाराष्ट्र ही काळाची गरज असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच वेगळा विदर्भ हवा असल्यास त्यासाठी जनमत घेणं गरजेचं आहे. कारण की, जनमत घेतल्याशिवाय वेगळ्या विदर्भाची मागणी करणं हा विदर्भावरच अन्याय होईल, असंही पवार म्हणाले.
तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र अखंड महाराष्ट्रावरुनच दोन गट पडले आहेत. अखंड महाराष्ट्राचा ठराव मांडण्याच्या तयारीत असलेल्या राणे, विखे आणि कंपनीची तक्रार आपण हायकमांडकडे करणार असल्याचं माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळं महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळ दोन गटात विभागल्याचं दिसतं आहे.