अरुण गवळीची पॅरोलसाठी याचिका
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी याने एक महिन्याचा पॅरोल मिळण्यासाठी याचिका दाखल केली आहे.
नगरसेवकाच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गवळीने प्रारंभी नागपूरच्या विभागीय आयुक्तांकडे अर्ज दाखल करून एक महिन्याच्या पॅरोलवर सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती. आजारी पत्नीवर शस्त्रक्रिया करावयाची आहे, असे कारण नमूद करून गवळीने एक महिन्याचा पॅरोलसाठी याचिका दाखल केली आहे. ही याचिका न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. अतुल चांदूरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस आली आहे. यावर ७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.