रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 14 सप्टेंबर 2016 (17:03 IST)

कोण होणार बाळासाहेब ठाकरे स्माराकासाठीच्या ट्रस्टचे सदस्य

शिवसेना प्रमुख आणि मराठी माणसाचे दैवत असेलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या महापौर बंगल्यातील स्माराकासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाने मंजूर केला आहे. तर ट्रस्ट करिता  लवकरच स्मारकासाठी पब्लिक म्हणजेच सार्वजनी ट्रस्ट स्थापन करण्यात येणार आहे. या ट्रस्टच्या सदस्यत्वासाठी शिवसेना नेत्यांमध्ये चढाओढ सुरु असल्याचं वृत्त आहे.
 
बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टमध्ये 7 ते 11 सदस्यांचे समावेश आहे. या सदस्यांमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं सदस्यत्व कायम असणार आहे. तर बीएमसी आणि राज्यातील संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही सदस्यत्व देण्यात येणार आहे.
 
मात्र त्यासोबतच शिवसेना पक्षातील आणखी दोन जणांची या ट्रस्टवर सदस्य म्हणून नेमणूक होणार आहे. या सदस्यत्वासाठी शिवसेना नेत्यांमध्ये चुरस लागली आहे. या चढाओढीत शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, लीलाधर डाके आणि संजय राऊत यांचा समावेश आहे. येत्या महिन्याभरात या पब्लिक ट्रस्टची नोंदणी होणार आहे. या ट्रस्ट अंतर्गत अनेक सार्वजनिक कामे होणे अपेक्षित असून या द्वारे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची देखभाल सुद्धा होणार आहे.