रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: कोल्हापूर , सोमवार, 20 जून 2016 (10:49 IST)

कोल्हापुरात युवतीची आत्महत्या

टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून कोल्हापुरात एका 17 वर्षीय युवतीने आत्महत्या  केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तिने पाच संशयितांची नावं लिहिल्याचीही माहिती आहे.  हे समजल्यानंतर आजूबाजूच्या व्यक्तींनी संशयितांच्या घरावर दगडफेक केली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर जमावाला पांगवण्यात आलं.

युवती तिच्या आजी आणि धाकट्या बहिणीसह राहत होती. जवळच्या एका बंगल्यात काम करत असताना अनेक वेळा परिसरातील काही टवाळखोर तिची छेड काढत असत. याच जाचाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे.