शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 ऑक्टोबर 2016 (12:02 IST)

जिल्हा परिषदेच्या शाळेतील ८०-९० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली

लातूर तालुक्यातील सलगरा बु. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ८०-९० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांवर लातूरच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरु असून चार विद्यार्थ्यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याचे वृत्त आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांना आज दुपारी देण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनातून-खिचडीतून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांना खाऊ घालण्यात आलेल्या खिचडीत चक्क पाल सापडली आहे. दुपारी हे भोजन घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली, अनेकांना उलट्या झाल्या. हा सारा प्रकार पाहून या सर्वांना लातूरच्या सरकारी दवाखान्यात आणले गेले. बहुतेकांची प्रकृती ठीक आहे. धास्तावलेल्या पालकांनी रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली होती. अधिक तपास केल्यानंतर खिचडीतली पालही सापडली. ही पाल उत्तमरित्या तळून आणि शिजून निघालेली होती. घटना समजताच लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, दगडू पडीले यांनी सरकारी दवाखान्यास भेट दिली, माहिती जाणून घेतली, सूचना केल्या.