ठाकरे वायकरांची 900 कोटींची जमीन खरेदी
मुंबई- गुहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप करणारे काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी आज थेट ठाकरे कुटुंबावर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. रायगड मुरुड परिसरात मातोश्री आणि वायकर यांनी मिळून 900 कोटींची जमीन खरेदी केल्याचा दावा निरुपम यांनी केला आहे.
मुरुड परिसरात उद्धव ठाकरे आणि वायकर यांच्या पत्नी मनिषा यांच्या नावे साडेचारशे एकर जमीन खरेदी केली आहे. रविंद्र वायकरांची पत्नी मनिषा वायकर आणि उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी यांच्या नावे रायगडच्या कोलई गावात साडेसहा लाख स्क्वेअर फूट जमीन आहे.
या जमिनीसाठी पैसा कुठून आला याची चौकशी करण्याची मागणी निरुपम यांनी केली आहे. तसंच विजयालक्ष्मी इन्फ्रा कंपनीत वायकर स्वत: संचालक आहेत. हीच कंपनी एसआरए प्रोजेक्टची कामे करत असल्याचं निरुपम यांचं म्हणणं आहे.