शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , बुधवार, 15 जून 2016 (15:54 IST)

डबे मागे सोडून मालगाडी रवाना!

कोल्हापूरहून पुण्याकडे येणाऱ्या मालगाडीचे 18 डबे पुढे निघून गेले, तर 18 डबे मागेच राहिले. कोल्हापूरहुन पुण्याकडे येणारी मालगाडी काळेपडळ या पुण्याजवळील एका जंक्शनवर सिग्नल मिळण्याच्या प्रतिक्षेत थांबली होती. त्याचवेळी कोणीतरी खोडसाळपणा केला आणि दोन डब्यांना जोडणारा पट्टा काढला. त्यामुळे सिग्नल मिळताच गाडी सुरु झाली आणि 18 डबे इंजिनसोबत गेले, तर 18 डबे मागे राहिले. बघ्यांची गर्दी झाल्यावर हा प्रकार ध्यानात आला.