बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वार्ता|

दिलीप कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या 138 व्या जयंती निमित्त 30 एप्रिलला प्रसिध्द ‍अभिनेते दिलीप कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

दिलीप कुमार यांना चित्रपट क्षेत्रातीत विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत आहे असे दादासाहेब फाळके अॅकॅडमिचे अध्यक्ष संतोष सिंह जैन यांनी सांगितले.

जैम्हणाले की दिलीप कुमार बरोबर जीतेंद्र शशिकला अरूणा इराणी कुमकुम सुशीला राणी पटेल व अमृता राव तसेच ‍निर्माता गुलशन बहल ‍निर्देशक लेख टंडन कमल कुमार, राजश्री प्रोडक्शन चे राजकुमार बडजात्या व गोतम कुमार यांनाही यावेळी सन्मानीत करण्यात येणार आहे.

यावेळी दादासाहेब फाळकेंच्या प्रतिमेचे अनावरण व फोळके गीत माला हा अल्बम प्रदर्शित केला जाणार आहे. त्यात पाच गीतांचा समावेश असेल.