मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: खालापूर , शुक्रवार, 29 एप्रिल 2016 (10:53 IST)

द्रुतगती महामार्गावर अपघातात दोघे ठार

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मध्यरात्री  कंटेनर व पिकअप जीपमधे भीषण अपघात झाला. अपघातात कंटेनरचालक व पिकअप जीपमधील दोघे ठार झाले. ही धडक एवढी जोरात होती की त्या जिपसह तो कंटेनर रस्त्याचा कठडा तोडून बाहेर गेला. हा अपघात मध्यरात्री घडल्याने मदत मिळण्यास उशीर झाला.