शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 ऑक्टोबर 2016 (10:13 IST)

पंतप्रधान मोदी- शरद पवार भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांची भेट घेतली आहे. मोदी यांच्या 7 लोककल्याण मार्ग या पंतप्रधान निवासस्थानी पवार आणि मोदी यांच्यामध्ये बैठक झाली. महाराष्ट्रातील मराठा मोर्चांसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. तर आता मराठा आरक्षण कोर्टात सुनावणी होणार त्यामुळे या भेटीला महत्व प्राप्त होत आहे.   
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीतील तपशील अद्याप समोर आली नाही.  मात्र, महाराष्ट्रातील मराठा मोर्चा आणि त्यातून होणार्‍या मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मूक मोर्चा मुळे अनेक पक्ष राजकीयदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. तर पूर्ण बाजू घेतली तर इतर समाज नाराज होण्याचे चिन्ह आहेत. यावर मध्यम मार्ग काय असेल हे पाहिले जात आहे.