शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 ऑक्टोबर 2016 (16:06 IST)

महाराष्ट्रात प्रथमच मोबाईल इंटरनेट आणि मद्य विक्री बंद

तळेगावच्या घटनेनंतर नाशिक जिल्ह्यात निर्माण झालेला तणाव अजूनही सुरूच आहे. नाशिक मध्ये अनेक ठिकाणी दगडफेक आणि इतर घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील बससेवा आणखी काही काळ बंद ठेवली आहे. तर अफवा रोखण्यासाठी इंटरनेट सेवा आणि मद्याची दुकानेही आणखी तीन दिवसांसाठी बंद राहतील, अशी माहिती पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी दिली आहे. 
 
सोमवारपासून भ्रमणध्वनीवरील इंटरनेट आणि बल्क एस एम एस पाठविण्याची सेवा बंद करण्याचा चांगला परिणाम झाला होता. त्यामुळे अफवेमुळे होत असलेल्या गोष्टीचे रोखण्यात पोलीस  यंत्रणेला यश आले. मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ आहे. तर या आगोदर नियमित पणे काश्मीर येथे तर गुजरात येथे इंटरनेट बंद ठेवले होते. शहरातील अनेक ठिकाणी वाय फाय आणि इतर संवाद साधने बंद ठेवली आहे.