शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: औरंगाबाद , शुक्रवार, 17 जून 2016 (11:54 IST)

मैत्रिणीला मेसेज करुन आत्महत्या!

होस्टेलमध्ये मैत्रिणींकडून होणारी रॅगिंग, सततचा छळ, चोरीचा आरोपाला कंटाळून 19 वर्षीय मेडिकल विद्यार्थिनीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने मैत्रिणीला मेसेज केला होता.

प्रतीक्षा मोतीराम वाघ असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून ती मूळची औरंगाबादची आहे.  ही विद्यार्थिनी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होती.

होस्टेलमध्ये मैत्रिणींकडून होणारी रॅगिंग, सततचा छळ, चोरीचा आरोपाला कंटाळून प्रतीक्षाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. तसंच आत्महत्येपूर्वी तिने मैत्रिणीला मेसेज केला होता.
मैत्रिणींनी रॅगिंग करुन माझ्या मुलीला त्रास दिला, त्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप मोतीराम वाघ यांनी केला आहे.