1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 18 जून 2015 (10:47 IST)

ये रे ये रे पावसा...

येणार येणार येणार म्हणत अखेर महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून येथे येताच सुस्त झाल्याने ऐन पावसाळ्यात राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पेरण्या ओळंबल्या असून बळीराजाकडून ये रे ये रे पावसा.. अशी आळवणी वरुणराजाला करण्यात येत आहे. केवळ एका टक्का क्षेत्रावरच खरीपाची पेरणी झाली आहे.

राज्यात खरिपाचे सुमारे १३५ लाख हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत केवळ सव्वा टक्के म्हणजे १ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्रांवरच पेरण्या झाल्या आहेत. पाऊस लांबल्याने ऐनवेळी उद्भवणार्‍या परिस्थितीचा सामना करण्यासाठी कृषी विभागाने  आपत्कालीन आराखडा तयार केला आहे. पेरण्या वाया जाण्याची शक्यता असल्याने जमिनीत पुरेसा ओलावा आल्याशिवाय शेतकर्‍यांनी खरिपाच्या पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.