शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 27 मे 2016 (09:18 IST)

शिवसेनेच तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल

जूनमध्ये होणार्‍या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या होणार्‍या निवडणुकींसाठी गुरुवारी शिवसेनेच्या तीन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. सुभाष देसाई व दिवाकर रावते यांनी विधानपरिषदेसाठी तर संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरले. परिषदेच्या 10 जागांसाठी 10 जून रोजी तर राज्यसभेच्या 6 जागांसाठी 11 जून रोजी मतदान होणार आहे. विधानसभेमधून या जागा निवडून द्यायच्या आहेत. राज्यसभेसाठी या आधी भाजपचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी उमेदवारी अर्ज 24 मे रोजीच भरला आहे. अर्ज भरण्याची मुदत 31 मे पर्यंत आहे.