सामनाच्या प्रिंटींग प्रेसवर आज दोन अज्ञात बाईकस्वारांनी दगडफेक केली
शिवसेना प्रमुख स्व. बाळ ठाकरे यांनी त्यांच्या व्यंगचितत्राने शिवसेना मुखपत्राला ओळख दिली आता असेच एक व्यंगचित्र सामनाच्या विरोधात गेले आहेत. या चित्रवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी सामना वृत्तपत्र जाळले असून आज शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या प्रिंटींग प्रेसवर आज दोन अज्ञात बाईकस्वारांनी दगडफेक केली आहे. सामनामधून मराठा क्रांती मोर्चाबद्दल व्यंगचित्र छापण्यात आलं आहे. त्या व्यंगचित्रानंतर मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या चित्रात एका मोर्चावर मूक मोर्चा नाही तर मुका मोर्चा (चुंबन ) असा उल्लेख केला आहे.यामुळे हे मराठा समाजच्या मोर्चावर आहे असे प्रथम दर्शनी दिसते मात्र हे असे नाही असे सामनाने स्पष्टीकरण दिले आहे.मात्र याचा आज त्याचाच परिणाम म्हणून दगडफेकीत झाल आहे. ठाण्यातील नितीन कंपनी जवळील श्रीजी आरकेड इमारतीतील पहिल्या मजल्यावर सामना दैनिक कार्यालयावर अज्ञातानी शाईफेक केली आहे.
सामना वर्तमानपत्रात मराठा समाजाच्या मूक मोर्चाबाबत छापून आलेल्या व्यंगचित्राचे पडसाद राज्यातल्या विविध भागात उमटले. मीरा-भायंदरमधल्या मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी व्यंगचित्रकार श्रींनिवास प्रभुदेसाई यांच्या विलेपार्ले येथील घराबाहेर आंदोलन केले. नाशिकमध्येही सिडकोच्या त्रिमूर्ती चौकात सामनाच्या अंकाची होळी करण्यात आली आहेत.