रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मार्च 2023 (08:44 IST)

केएमटीच्या तोट्यातील 10 फेऱ्या बंद कुडीत्रे गावातील बस सेवा पूर्ण बंद

कोल्हापूर तोट्यातील 10 फेऱ्या शुक्रवारपासून बंद करण्याचा निर्णय केएमटी प्रशासनाने घेतला आहे. तसेच उद्या पासून कुडीत्रे गावातील बस सेवा पूर्ण बंद केली जाणार आहे. येथील सर्व तीन खेपा थांबविण्यात आल्या आहेत. हद्दवाढीसाठी शहरातील नागरिकांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. यामुळे हद्दवाढीतील गावांनाही हद्दवाढीला विरोध करण्यास सुरू केला.यामुळे आक्रमक झालेल्या हद्दवाढ कृती समितीने शहराबाहेर तोट्यातील केएमटीची सेवा बंद करा, अशी मागणी लावून धरली. यावर केएमटी प्रशासनाने 26 फेऱ्या पैकी कमी उत्पन्न मिळत असलेल्या 13 मार्गांचे सर्व्हेक्षण केले. यामध्ये ज्या खेपांना अत्यंत कमी प्रवासी असणाऱ्या 10 खेपा बंद करण्याचा प्रस्ताव केएमटी प्रशासनाने मनपा उपसमितीसमोर ठेवला. समितीच्या मंजूरीनंतर ही फाईल प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांचीकडे पाठविली होती. त्यांनीही तोट्यातील 10 फेऱ्या बंद करण्याच्या निर्णयास ग्रीन सिंग्नल दिला. त्यामुळे तोट्यातील 10 फेऱ्या आज, शुक्रवारपासून बंद होणार आहेत.
 
बस बंद होणारे मार्ग
 
सकाळी 6.15 वा.ची श्री शाहू मैदान ते मुडशिंगी
रात्री 9.25 वा.ची श्री शाहू मैदान ते कळंबा
सायं.7.55 वा.ची शिवाजी चौक ते कळंबा
रात्री 9.10 वा. ची आर.के.नगर राजारामपुरी, शाहू मैदान
 
कुडीत्रे गावातील प्रवाशांचे हाल
कुडीत्रे गावात दिवसांतून 3 खेपांद्वारे बस सेवा सुरू होती. हे तीन्ही खेपा तोट्यात होत्या. यामुळे उद्यापासून येथील सर्व फेऱ्या बंद करण्यात येणार आहेत. यामुळे कुडीत्रे गावातील बसने प्रवास करण्याऱ्यांचे हाल होणार आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor