मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (14:37 IST)

ट्रकने चिरडल्या 100 मेंढ्या

100 sheep crushed by truck ट्रकने चिरडल्या 100 मेंढ्या Maharashtra News Regional Marathi News  IN webdunia Marathi
अमरावतीत  परतवाडा वरून अंजनगाव सुर्जीच्या दिशेने महामार्गावरून भरधाव येणाऱ्या एका ट्रक ने  शेतात जाण्यासाठी मेंढपाळ आपल्या मेंढ्याना घेउन जात असताना 100 मेंढ्या चिरडल्या. या मुळे मेंढपाळ्याचे खूपच नुकसान झाले असून त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे मेंढपाळ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. संपूर्ण रस्त्यावर मासांचा आणि रक्ताचा सडा पडला होता. या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ट्रक चालकास  ताब्यात घेतले आहे. मेंढऱ्याना चिरडणारा हा ट्रक राजस्थानमधून येत होता. अशी माहिती मिळाली आहे.