शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (09:09 IST)

महाराष्ट्राला पर्यावरण संवर्धनासाठी पुरस्कार

पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेकडून दखल घेतली असून महाराष्ट्राला 'इन्स्पायरिंग रिजनल लिडरशीप साठी पुरस्कार मिळाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 कॉन्फरन्समध्ये भाषण केलं होतं.

महाराष्ट्राला अंडर-2 कोईलेशन फॉर क्लायमेट अ‍ॅक्शनकडून हा पुरस्कार मिळाला आहे. स्कॉटलंडमध्ये अंडर-2 कोलिशन फॉर क्लायमेट अ‍ॅक्शनतर्फे तीनपैकी एक पुरस्कार जिंकणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे.
 
"हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वन्यजीव प्रेमी आणि संवर्धनवादी दृष्टीकोन असणारे नेते आहेत. त्यांनी आम्हाला चांगल्या आणि हरित भविष्याची स्वप्ने पाहण्याची संधी दिली आहे. पर्यावरण जपण्यासाठी आम्ही माझी वसुंधरा म्हणजेच 'माय प्लॅनेट' ही चळवळ सुरू केली आहे," अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.