बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (14:23 IST)

धक्कादायक ! पत्नी मुलीचा निर्घृण खून करून आरोपी पती फरार

सोलापुरात धक्कादायक घटना घडली आहे. सोलापुरात जिल्ह्यात करमाळा तालुक्यात भिलारवाडी येथे एका नराधमाने आपल्या पत्नी आणि मुलीचा डोक्यात घाव घालून निर्घृण खून केला. लक्ष्मी अण्णा माने(30) आणि शृती अण्णा माने(12) असे मयत झालेल्या आई लेकीची नावे आहेत.  तर यांना ठार मारणारा संशयितआरोपी अण्णा भास्कर माने खून केल्यावर पळून गेला आहे. आरोपी अण्णा माने आपल्या मुली शृती,मुलगा रोहित,पत्नी लक्ष्मी ,आणि आपल्या आईसह भिलारवाडी येथे राहात होते. मयत झालेल्या व्यक्ती आणि आरोपी हे एका खोलीत तर मुलगा आणि आजी दुसऱ्या खोलीत होते. सकाळी सहा वाजता अण्णा माने यांना मुलाने रोहित ने मोटरसायकल वरून बाहेर जाताना बघितले. सकाळी उठल्यावर खोलीत शिरल्यावर आई लक्ष्मी आणि शृती या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. आरोपीने खून कोणत्या कारणावरून केला हे अद्याप कळाले नाही.पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेमुळे करमाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.