सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (10:51 IST)

10th, 12th Board Exam 2022 : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. नंतर रद्द करण्यात आल्या. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा आणि महाविद्यालये देखील सुरु करण्यात आल्या आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये. या साठी खबरदारी घ्यायला सांगितले आहे. दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यासाठी शिक्षण विभाग चाचपणी करत आहे. या साठी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत  राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, यांचा समावेश होता. यांच्या कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्या संदर्भातचे मत जाणून घेतले. 
 
या बैठकीत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.त्यासाठी बारावी आणि दहावी च्या परीक्षा पद्धतीत काही बदल करता येईल का?  लेखी परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी लागणार.? कोणते वेगळे पर्यायाची निवड करता येईल का ? अंतर्गत मूल्यमापनाचे नियोजन कसे करता येईल . हे मुद्दे देखील या बैठकीत मांडण्यात आले आणि यावर चर्चा केली गेली.
 
गेल्यावर्षी कोरोनामुळे बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या माध्यमाने जाहीर करण्यात आला. या मुळे निकाल काढताना जरी गुणांची टक्केवारी वाढली तरी गुणवत्ते संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यासाठी देखील नियोजन कसे करावे यावर देखील चर्चा करण्यात आली. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घ्यावा अशी मागणी शिक्षक आणि शाळा, महाविद्यालय संस्थाचालकांच्या प्रतिनिधींनी केली आहे. 
 
कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत राज्यात दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले आहे. दहावी व बारावीच्या परीक्षे संदर्भात शिक्षण विभागाकडून वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय जाहीर करण्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. या साठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागाची बैठक झाली. या वर सर्वांची सविस्तर मते जाणून घेतली.