मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जून 2023 (23:37 IST)

राज्य सरकार कडून सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 1500 कोटी रुपयांची मंजुरी

eknath shinde
सततच्या पावसामुळे गेल्यावर्षी शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. अशा बाधित शेतकऱ्यांसाठी 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना राज्य सरकार कडून मदत दिली जाणार आहे. 
राज्य सरकार कडून सततचा पाऊस नवीन आपत्ती घोषित करून मदत देण्या बाबतचा निर्णय 5 एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने आणि निकषानुसार मदत देण्याचा निर्णय राज्य सरकार कडून देण्यात आला आहे. 

केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहे. त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 8 हजार 500 रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 22 हजार 500 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 22 हजार 500 रुपये प्रति हेक्टर अशी 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाणार आहे. 
 
Edited by - Priya Dixit