मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मार्च 2021 (17:50 IST)

येत्या १ एप्रिलपासून वीज ग्राहकांसाठी वीज दरात २ टक्के कपात

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने येत्या १ एप्रिलपासून वीज ग्राहकांसाठी वीज दरात २ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. वीज ग्राहकांसाठी ही खुशखबर असून बेस्ट, टाटा, अदानी आणि महावितरण यांच्या वीज दरात कपात होणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने सदस्य मुकेश खुल्लर यांनी याबाबतची माहिती एका मराठी वृत्तवाहिनीला दिली.
 
गेल्या महिन्यांपासून वीज दरात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे मध्यमवर्गीयांवरती अतिरिक्त बोजा पडत होता. दोन दिवसांपूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जोपर्यंत वाढीव वीज दराबाबत सभागृहात चर्चा होत नाही, तोपर्यंत कोणाचे वीज कनेक्शन कापण्यात येणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर वीज नियामक आयोगाकडून सर्व वीज कंपन्यांच्या बिलात २ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यभरात सुमारे साडे तीन कोटी वीज ग्राहक असून या ग्राहकांना २ टक्के वीज कपातीचा निर्णयाचा फायदा होणार आहे.