बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (20:48 IST)

नवापूरात पोल्ट्री फार्ममध्ये 20 हजार कोंबड्या दगावल्या

नंदुरबार  जिल्ह्यातील नवापूरात  एका पोल्ट्री फार्ममध्ये  20 हजार कोंबड्या मरण पावल्या आहेत. याबाबतची तक्रार प्रशासनाने करण्यात आली आहे. या तक्रारीत प्रथम दर्शनी तथ्य आढळून आल्याने तात्काळ उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. या कोंबड्याना बर्ड फ्लूने की आणखीन कुठल्या आजाराने  मेल्या हे अहवालनंतर स्पष्ट होणार आहे. 
 
या कोंबड्यांच्या मृत्यूचे करण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मेलेल्या कोंबड्या या खड्ड्यात पुरण्यात आल्याची निनावी तक्रारीवरून तहसीलदार यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी आणि तलाठयांनी संबंधित पोल्ट्री फार्मवर जाऊन पंचनामा केला. नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा उपाय योजयला सुरुवात केली आहे.