गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

महाराष्ट्रातील तीन जणांना राष्ट्रपती पोलिस पदक

प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात येणार्‍या राष्ट्रपती पोलिस पदकाची केंद्र सरकारच्यावतीने घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील तीन पोलिस अधिकार्‍यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर देशभरातील 80 पोलिस अधिकार्‍यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
 
राष्ट्रपती पोलिस पदक विजेत्यांमध्ये अतिरिक्त पोलिस महासंचालक व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण, रत्नागिरीचे पोलिस उपअधीक्षक महादेव गावंडे आणि कोल्हापुराचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवप्पा मोरटी यांचा समावेश आहे. त्याशिवाय राज्यातील 39 पोलिस अधिकार्‍यांना पोलिस पदक देऊन सन्मान करण्यात येणार आहे.