गुरूवार, 20 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मार्च 2023 (16:55 IST)

स्कूल बसच्या अपघातात 30 विद्यार्थी जखमी

30 students injured in school bus accident Jamner
जामनेर  तालुक्यात पाहुर  शेंदुर्णी दरम्यान  विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या बसचालकाचा बस वरील नियंत्रण सुटल्याने बस  रस्त्यालगत भल्या मोठ्या झाडावर आदळून पालटून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली. या बस मध्ये अपघातात 40 पैकी 30 विद्यार्थी जखमी झाले आहे. बसचा पाटा  तुटल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस रस्त्यावरील बाजूच्या खोल भागात पडली. धडक झाल्यावर बस पालटून हा अपघात झाला. 30 विद्यार्थी जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.  
 
Edited By - Priya Dixit