कोल्हापूर मध्ये राज्यातील सर्वात उंच 303 फूट उंचीचा तिरंगा
देशातील दुसरा व राज्यातील सर्वात उंच राष्ट्रध्वज स्तंभ पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस उद्यानात उभारण्यात आला आहे.
वाघा बॉर्डरनंतर देशातील दुसर्या क्रमांकाचा तर राज्यातील सर्वात उंच असा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे.
कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पातंर्गत कोल्हापूर पोलीस उद्यानामध्ये 303 फुट उंचीच्या ध्वजस्तंभ उभारण्यात आला असून आज सकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रिमोटच्या सहाय्याने राष्ट्रध्वज फडकावण्यात आला.
कोल्हापूर शहराच्या सर्व बांजूनी हा राष्ट्रध्वज सहज दिसू शकेल. ध्वजाचे वजन २४ टन, ध्वजस्तंभाचा बेस ५ फूट, तिरंगा ध्वज ९0 फूट लांब व साठ फूट रूंद म्हणजे ५४00 चौरस फुटांचा आहे. यासाठी स्पेशल पॉलिस्टर पॅराशुट फॅब्रिक्सचे कापड वापरले आहे. ध्वजस्तंभासाठी एक कोटी रुपये खर्च करण्यात आले असून हा ध्वजस्तंभ शहराच्या सौंदर्यासह पर्यटनाचा अविभाज्य घटक बनणार आहे.