1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मार्च 2022 (08:22 IST)

अपघात विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या वारसांना मिळाले ३७ लाख

मालेगाव तालुक्यातील १९ शेतकऱ्यांचे अपघातात निधन झाले आहे. त्यासाठी गोपानाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत त्यांच्या कुटूंबियांना उभारी देण्यासाठी विमा दाव्याची रक्क्म प्रत्येकी रुपये २ लाख याप्रमाणे ३७ लाख रुपये आरटीजीएस मार्फत निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या खात्यावर वितरीत करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.

आज मालेगाव तालुक्यातील टेहरे, पाटणे, आघार खु., चिंचावड, नांदगाव बु., सौंदाणे, वाके आणि मुंगसे या गावात शासनाच्या विविध योजनांची माहिती गाव पातळीवर पोहचविण्यासाठी कृषीमंत्री श्री. भुसे यांचा गावनिहाय दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद महाजन, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तहसिलदार चंद्रजित राजपूत, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत असतांना म्हणाले, गोपानाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत खंडीत कालावधी १० डिसेंबर, २०२० ते ६ एप्रिल,२०२१ या कालावधीतील महाराष्ट्रातील एकूण १ हजार ७४५ शेतकऱ्यांचे अपघातील निधन झाले अथवा अपंगत्व प्राप्त झाले, पहिल्या टप्प्यात पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने विशेष बाब म्हणून विमा दाव्याची रक्कम रपये ३४ कोटी ७३ लाख वितरीत करण्यात आली असल्याचेही कृषीमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

मालेगाव तालुक्यातील १९ शेतकऱ्यांचे निधन झालेल्या वारसांच्या खात्यात रुपये 2 लाख जमा केल्याचे प्रमाणपत्र कृषीमंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते मंगल लखन सोनवणे-सिताणे, इंदूबाई मते- दहिवाळ, मंगल राजाराम सोनवणे- सोनज, दादासाहेब पवार- सौंदाणे, पुष्पा पवार- पिंपळगाव, नरेंद दिंगर-हाथने, त्र्यंबक जगताप-जतपाडे, बिबाबाई दाते-टाकळी, नरेंद्र पवार-जळगाव (गा.),  सरलाबाई दरखा-जळकू, पुष्पा जगन्नाथ पवार-सौंदाणे, अजय अहिरे-साकुरी (नि.),रुपाली जाधव-गाळण, कैलास अहिरे-मालेगाव, मनिषा पगारे-आघार खु., पिराजी निकम-रोझे, निंबाबाई अहिरे-दाबली आणि देविदास जाधव-अजंग यांना वाटप करण्यात आले.

कोरोना काळात तालुक्यातील विकासकामे थांबली होती. परंतु आता जनजीवन पुर्वपदावर येत आहे. यामुळे तालुक्यातील विकासकामे जलदगतीने मार्गी लावण्यात येणार  असल्याचे कृषी मंत्री श्री. भुसे यांनी  यावेळी सांगितले.

यावेळी मंत्री भुसे म्हणाले की, शेतकरी महिलांनी आपले नाव लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत  सात बारा उतारावर लावून कृषी विभागाच्या योजनेचा लाभ मोठया प्रमाणात घेण्याचे आवाहन यावेळी कृषीमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी केले. यावेळी गावातील आरोग्य, कृषी, रस्ते, वीज, नदी जोड प्रकल्प पुर्ण करणे, घरकुल योजना, ट्रान्सफॉर्मर बदलणे, ग्रामीण पाणी पुरवठाची कामे पूर्ण करणे आदी समस्यांबाबत गावकऱ्यांनी मंत्री महोदय यांच्यासोबत संवाद साधून सविस्तर चर्चा केली. या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे यावे असे संबधित विभागांना सूचनाही यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.

प्रत्येक गावात कृषी कार्यालयाने महाडीबीटी मार्फत निवड झालेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधुन कागदपत्रे अपलोड करण्याबाबत मार्गदर्शन करावे अशा सूचनाही यावेळी कृषीमंत्री श्री. भुसे यांनी संबधित विभागाला दिल्या आहेत. तसेच मालेगाव तालुक्याचा नानाजी देशमख संजीवनी प्रकल्प योजनेत सहभाग झाल्याने या योजनाचा लाभ येणाऱ्या काळात लवकरच होणार आहे. ज्या लाभार्थ्यांची निवड संजय गांधी निराधार योजनेमध्ये झाली आहे, त्यांचे हयातीचे दाखले प्राप्त करुन तहसिलदार यांना सादर करावे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी भुसे यांनी गावकऱ्यांना केले. यावेळी मंत्री भुसे यांच्या हस्ते राष्ट्रीय कृषी विकास योजनांतर्गत व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनांतर्गत चिंचावड, नांदगाव बु., सौंदाणे या गावातील लाभार्थ्यांना रोटाव्हेटर व ट्रॅक्टर कृषीमंत्री भुसे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.