1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मार्च 2022 (08:16 IST)

दुर्दैवी! शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या लोणवाडी (ता. निफाड) परिसरातल्या शेततळ्यात (farm ponds) पडून दोन सख्या भावांचा (brothers) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत चार वर्षांच्या कुणाल गायकवाड आणि सात वर्षांच्या गौरव गायकवाडचा समावेश आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

कुणाल आणि गौरव खेळण्यासाठी घराबाहेर पडले होते. ते फिरता-फिरता शेततळ्याकडे गेले. लहानगा कुणाल शेततळ्यातल्या पाण्यात पडला. ते पाहून गौरवने आरडाओरडा केला. मात्र, परिसरात कोणी नव्हते. त्यांच्या मदतीला कोणीही धावले नाही. शेवटी कुणालला बाहेर काढण्यासाठी गौरव पाण्यात उतरला. मात्र, शेततळ्यातून दोघांनाही बाहेर पडता आले नाही.
 
वाट निसरडी असल्यामुळे दोघेही तळ्यातल्या पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सध्या उन्हाळ्याच्या दिवस आहेत. अनेक शाळकरी मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत. तेव्हा मुले दिवसभर घरी एकीटच असतात. अनेक जण घराबाहेर पडतात. त्यांच्यावर पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे.
===========================