शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 29 मार्च 2022 (08:13 IST)

जोतिबाच्या नावानं चांगभलं! या वर्षी यात्रा होणार की नाही वाचा सविस्तर

कोरोना महामारीच्या कारणामुळे मागील साधारण 2 वर्षांपासून संपूर्ण जग ठप्प आहे. त्यामुळे अनेक देवस्थानांचा कारभारही ठप्प आहे. परंतू, आता भारतासह महाराष्ट्रात कोरोना महामारीचा संसर्ग कमी होताना दिसतोय. ह्याच पार्श्वभूमीवर आता राज्यभरातील देवस्थानांच्या ठिकाणी होणाऱ्या यात्रोत्सवांना परवानगी दिली जात आहे.
 
कोल्हापूरमधील जागृत देवस्थान म्हणून नावलौकीक असलेल्या श्री जोतिबा देवाच्या यात्रेला विनाशर्त परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आढावा बैठकीत दिली आहे. त्यामुळे 2 वर्षांनंतर श्री जोतिबा चैत्र यात्रा पूर्ण क्षमतेने होणार आहे.
 
दख्खनचा राजा म्हणूनही श्री जोतिबाचा नावलौकीक आहे. दरम्यान, तब्बल 2 वर्षांनंतर श्री जोतिबाच्या यात्रेचं आयोजन होणार असल्याने भक्तांमध्ये फार उत्सुकता आहे. यंदाच्या वर्षी यात्रेला 10 लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, यात्रेवेळी बंदोवस्तासाठी इतर जिल्ह्यातून पोलिसांना बोलाविण्यात येतील असंही सतेज पाटील यांनी सांगितलं.