शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (08:46 IST)

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात ३७ जणांना विषबाधा

नवरात्रोत्सवानिमित्त खरेदी केलेल्या भगर आणि भगरीचें पिठातून विषबाधा होऊन औरंगाबादच्या लासूर स्टेशन भागातील एकाच वेळी १३ जणांना विषबाधा झाली आहे. तर तर जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील २४ जणांना विषबाधा झाली आहे. या घटनेने दोन्ही जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
 
मिळालेली माहिती अशी की,
औरंगाबादच्या लासूर स्टेशन येथे नवरात्रोत्सवानिमित्त भगर व भगरीचें पीठ परिसरातील विविध गावांमधील ग्रामस्थांनी खरेदी केले होते.या भगरीचे सेवन केल्यानंतर १३ ग्रामस्थांना पोट दुखणे, उलट्या, चक्कर येत असल्याने गावातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. यावेळी विषबाधा झाल्य़ाचे लक्षात आले.
 
जालन्यात २४ जणांना विषबाधा…
औरंगाबाद प्रमाणे जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात देखील भगर व भगरीचें पिठातून विषबाधा झाल्याचं समोर आलंय. परतुर तालुक्यातील चार गावांमधील २४ जणांना विषबाधा झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात महिलांचा सर्वाधिक समावेश आहे. तर विषबाधा झालेल्या सर्वच व्यक्तींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.