अपघातात 4 जिवलग मित्रांचा मृत्यू
अपघातात मृत्युमुखी होण्याचे परिणाम सध्या वाढले आहे. निजामाबाद इंदलवाई मंडळ नेशनल हायवेवर भरधाव वेगाने येणारी कार कंटेनरमध्ये जाऊन धडकली या अपघातात 4 जिवलग मित्रांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. गणेश निरडी, आदित्य निरडी, साईराम आणि प्रकाश अंकलवार राहणार कुंडलवाडी असे मयत तरुणांची नावे आहेत.
हे चौघे जिवलग मित्र असून त्यापैकी तिघींचा मोबाईल एक्सेसरीजचा व्यवसाय असून आदित्य ,गणेश आणि प्रकाश हे कुंडलवाडीचे रहिवासी असून साईराम हा निजामाबादच्या जवळचा रहिवासी होता. आदित्य ,गणेश आणि प्रकाश यांचा मोबाईलचा ऍक्सेसरीजचा व्यवसायानिमित्त हे सर्व सामान आणायला हैदराबाद गेले होते. रात्री परत येताना यांचा कारने रस्त्याच्या कडेला उभारलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली त्यात या चौघांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. या तरुणांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे.
Edited By - Priya Dixit