शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 मार्च 2023 (16:53 IST)

उद्यापासून 18 लाख सरकारी कर्मचारी संपावर

राज्याचे तब्बल 18 लाख सरकारी कर्मचारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर उद्यापासून संपावर जाण्याच्या भूमिकेवर ठाम असून संप  पुकारणार आहे . नवीन पेन्शन योजना  रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याची मागणी सह कंत्राटी व योजना कामगार यांना समान वेतनमान देऊन त्यांच्या सेवा नियमित करावी. रिक्त पदे भरणे अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाशर्त करा. तसेच कोरोना काळात मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वयाधिक झालेल्या पाल्यांना विहित वय मर्यादेत सूट द्या.सर्व अनुषंगिक भत्ते केंद्रासमान मंजूर करणे .
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची मंजूर पदे निरसित न करता. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने मांडलेल्या इतर सर्व प्रलंबित मागण्या सत्वर मंजूर करणेशिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न तत्काळ सोडवणे.निवृत्तीचे वय 60 वर्षे करणे.या सर्व  मागण्यां असून सरकार कडून कोणतेही आश्वासन न मिळाल्याने कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहे.  
 
Edited By - Priya Dixit