सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2023 (09:07 IST)

दलित पँथर या क्रांतिकारी संघटनेच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण

Ramdas Athawale
दलित पँथर या क्रांतिकारी संघटनेच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात दलित पँथरचे सुवर्ण महोत्सव मेळावे आयोजित करण्यात आले आहे. हा मेळावा 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता औरंगाबादमध्ये होणार आहे.
 
आंबेडकरी चळवळीत ऐतिहासिक ठरलेल्या दलित पँथर या क्रांतिकारी संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याचे 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता औरंगाबाद येथील आमखास मैदानात आयोजन  करण्यात आले आहे. दलित पँथर सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्या निमित्त आयोजित भव्य करण्यात आले आहे. मेळाव्याचे उद्घाटन रामदास आठवले करणार आहेत.
 
Edited By - Ratnadeep ranshoor