सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 24 मे 2017 (14:14 IST)

पुणेकर फिटनेसच्या बाबतीत देशात अव्वल!

पुणेकर फिटनेसच्या बाबतीत खूपच जागरुक आहेत. याबाबत नुकताच  फिटनेस ब्रॅण्ड रिबॉकनं केलेल्या फिट इंडिया सर्व्हेतून ही गोष्ट समोर आली आहे.  यात 60 टक्के भारतीय आठवड्यातून किमान 4 तास आपल्या फिटनेससाठी देतात. यामध्ये पुणेकर सर्वाधिक वेळ देत असल्याचं या सर्व्हेतून समोर आलं आहे. सर्व शहरांमध्ये पुणेच्या फिट स्कोअर सर्वाधिक आहे. पुण्याचा फिटनेस स्कोअर 7.65% एवढा आहे.  एकापेक्षा जास्त फिजिकल अॅक्टिव्हिटी करतात. पुण्यानंतर चंदीगडचा फिटनेसमध्ये क्रमांक लागतो. चंदीगडचा फिटनेस स्कोअर 7.35% आहे.

चंदीगडमधील तरुणांचा निरोगी लाईफस्टाईलकडे फार ओढा आहे. येथील लोकं फिटनेससाठी फक्त रनिंगच करत नाही तर योग देखील न चुकता करतात. पुणे आणि चंदीगड फिटनेसमध्ये पुढे असले तरी दक्षिणेकडील हैदराबाद, बंगलोर आणि चेन्नई यासारखी शहरं याबाबतीत बरीच मागे आहेत. त्यांचा फिटनेस स्कोअरही फारच कमी आहे. या फिटनेस टेस्टमध्ये 20 ते 35 वर्षाचे 1500 महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. देशातील आठ मोठ्या शहरांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला होता. सर्व्हेत सहभागी होणाऱ्या 80% लोकं निरोगी लाईफस्टाईलसाठी आग्रही होते.