1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जुलै 2022 (21:09 IST)

उद्धव ठाकरे यांना नाशिकच्या 600 शिवसैनिकांनी प्रतिज्ञानापत्र दिले भेट

uddhav thackeray
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्ह्यातील 600 शिवसैनिकांनी प्रतिज्ञानापत्र भेट दिले आहेत.जिल्ह्यातील दोन आमदारांसह खासदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यही शिंदे गटात जातात की काय, अशी अंदाज वर्तवला जात होता. मात्र, शिवसैनिकांनी रविवारी मातोश्रीवर जात आपली निष्ठा दाखवून दिली.
 
या निष्ठेमुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांचा उत्साह वाढलेला दिसून येतो. मात्र, कायदेशीर लढाईत पक्षाची पिछेहाट व्हायला नको म्हणून सदस्य नोंदणीसह प्रत्येक शिवसेना पदाधिकार्‍याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांना तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, पंचायत समितीचे गटनेत्यांसह प्रमुख नेत्यांचे प्रतिज्ञापत्र ‘मातोश्री’वर जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी सदस्य, पदाधिकारी कामाला लागले आहेत.पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त भेट म्हणून सहाशे प्रतिज्ञापत्र जमा केल्याचे समजते. तसेच प्रतिज्ञापत्र दिलेल्या शिवसैनिकांना सदस्त्यत्वाचे ओळखपत्रही दिले आहेत.