शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 एप्रिल 2024 (20:44 IST)

बाप्परे , आजारी असलेल्या पोटच्या लेकालाच 37 वर्षीय पित्याने जीवे ठार मारले

child death
मुंबईच्या मानखुर्दमध्ये आजारी असलेल्या पोटच्या लेकालाच 37 वर्षीय पित्याने जीवे ठार मारले आहे. पोलिसांनी या नराधम पित्याला अटक केली असून आरोपीचे नाव इम्रान अन्सारी आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी पत्नी सकीना आणि त्यांचा दीड वर्षांचा मुलगा अफान यांच्यासोबत राहत होता. अफान किडनीच्या आजाराने ग्रस्त होता. त्यामुळे दीर्घकाळापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याच्या उपचारांसाठी मोठा खर्च होत होता. त्यामुळं इम्रान आणि सकीना हे आर्थिक संकाटांसोबत लढत होते.
 
अफानची आई सकीनाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती जेव्हा घरी आली तेव्हा अफान झोपलेला होता. नेहमी वेदनेने कळवळणाऱ्या अफानला शांतपणे झोपलेले पाहून सकीनाला थोडे आश्चर्य वाटले. तिने मुलाला जागे करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो रडला सुद्धा नाही. सकीनाला अफान बेशुद्ध असल्याचा संशय आला. तसंच, त्याच्यासोबत काहीतरी वाइट घडले असावे, या भीतीने तिने पती इम्रानसोबत त्याला रुग्णालयात दाखल केले.
 
रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी अफानला तपासल्यानंतर मृत घोषित केले. अफानच्या डोक्यावर जखमांचे निशाण दिसत होते. त्यामुळं पोलिसांना या प्रकरणात काही काळेबेरं असल्याचा संशय आला. त्यांनी लगेचच पोलिसांत याबाबत माहिती दिली. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी इम्रानची चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबानुसार, अफान सतत रडत होता. त्याचे रडणे थांबवण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले मात्र तो थांबतच नव्हता. या रडण्यामुळे चिडलेल्या वडीलाने  त्याचे डोके जमीनीवर आपटले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. 

Edited By - Ratnadeep Ranshoor