नागपुरात घरात दिवाळीची साफ सफाई करताना 4 वर्षाच्या मुलीचा मृत्यू
Nagpur : दिवाळी हा हिंदूंचा मोठा सण आहे. दिवाळीपूर्वी लोक आपल्या घराची साफ सफाई करतात दिवाळीच्या आधी साफ सफाई करताना एका कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे दिवाळीची साफ सफाई करताना नागपुरातील माधवनगरीच्या इसनानी भागात एका चार वर्षाच्या मुलीवर लाकडाचे कपाट पडले या मध्ये ती गंभीर जखमी झाली असता तिला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला.
ईकविरा राजेश गहलोत असे या चिमुकलीचे नाव आहे ऐन सणासुदीच्या वेळी तिच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे
सदर घटना नागपुरातील माधवनगरच्या इसनानी भागातील आहे मूळचे राजेश गहलोत हे राजस्थानचे असून कामानिमित्त नागपुरात आपल्या कुटुंबासह राहतात. दिवाळीची साफ सफाई करत असताना त्यांनी घरातील चपला ठेवण्याचे जुने लाकडी कपाट घराबाहेर ठेवले होते इकवीरा घरातील अंगणात खेळत होती .
खेळता-खेळता ती कपाटाजवळ आली आणि कपाट तिच्या अंगावर पडले. अवजड कपाटाच्या खाली दबून ती गंभीर जखमी झाली. तिचा रडण्याचा आवाज ऐकून घरातील सर्वजण आवाजाच्या दिशेने धावले मात्र तिला कपाटाने जबर मार लागला होता. तिला तातडीनं रुग्णालयात नेले असता उपचाराधीन तिचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Edited by - Priya Dixit