मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024 (14:15 IST)

लातूर मध्ये शिपाईला 50 हजारांची लाच घेताना रंगे हात पकडले

Bribe
लातूर मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील एका शिपायाला 50 हजार रूपयांची लाच घेताना रंगे हात पकडले. या शिपायाला अटक करण्यात आले आहे. 
 
मिळलेल्या माहितीनुसार, शासनाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातून अंगणवाडी मदतनीससाठी रिक्त पदे काढण्यात आली होती. या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी नियुक्तीचा अर्ज भरला पदाचा निकाल जाहीर झाला असून त्यांना प्रतीक्षा यादीत ठेवले.
 
अंगणवाडीच्या पदावर नियुक्ती करण्यासाठी आरोपीने तक्रारदाराला 1 ऑक्टोबर रोजी फोन केला आणि तुझी नियुक्ती या पदासाठी होईल असे सांगितले. 

लातूरमधील अंगणवाडी मदतनीसच्या पदावर नियुक्ती देण्याचे सांगून फिर्यादीकडून शिपायाने 80 हजारांची लाच मागितली. नंतर आरोपी 50 हजार रुपायांसाठी तयार झाला. फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाच लुचपतप्रतिबंधक विभागाने त्याला सापळा रचून  रंगेहात अटक केली आहे. शिवाजीनगर ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 
Edited By - Priya Dixit