नागपूरमधील रुग्णांच्या मृत्यूंबाबत प्रशासनाचा वेगळाच खुलासा
नागपुरातील शासकीय रुग्णालयात 48 तासांत 25 मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात 16 रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातले तर 9 रुग्ण हे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातले आहेत. 25 पैकी 12 रुग्ण हे शेवटच्या क्षणाला खासगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते.
तसंच, खासगी रुग्णालय रुग्णांची स्थिती बघून त्यांना अॅडमिट करून घेतात, तर शासकीय रुग्णालयात सर्वांनाच अॅडमिट करून घ्यावं लागलं त्यामुळे मृत्यूचे हे मोठे आकडे दिसत असल्याचं या रुग्णालयातील प्रशासनाचं म्हणणं आहे. तसंच, रुग्णांच्या मृत्यूचा हा आकडा नियमित असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. त्यांनी हा खुलासा केल्यानंतर मात्र आता एकच खळबळ उडाली आहे.
शासकीय रुग्णालयांत मृत्यूतांडव
ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूतांडव सुर आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 31 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात 16 नवजात अर्भकांचा समावेश आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एका दिवसता झालेल्या मृत्यूचा हा आजवरचा सर्वात मोठा आकडा आहे.
एका बेडवर दोन ते तीन बालकांवर उपचार सुरू होते अशी धक्कादायक माहितीही समोर आली आहे. तसंच, छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयातही 24 तासांत 18 जणांचा मृत्यू हे मृत्यू औषधांचा तुटवडा किंवा प्रशासनाच्या कमतरतेमुळे झाले नाहीत असा दावा रुग्णालयाचे डीन संजय राठोड यांनी केला आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor