मंगळवार, 15 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (14:59 IST)

पन्हाळ्यात चार पायाच्या कोंबडीच्या पिल्लाचा जन्म

निसर्गाची किमयाच काही वेगळीच असते. सार काही निसर्गाप्रमाणेच घडत असत. परंतु काही  काही गोष्टी निसर्गाला अपवाद असतात. अशा गोष्टी निसर्गाच्या विरुद्ध होतात. या गोष्टी दुर्मिळ असतात. अशीच दुर्मिळ गोष्ट तालुका पन्हाळ्याच्या बोरिवडे येथे घडली आहे. 

बोरिवडे येथे सखाराम हिंदुराव शिंदे यांचा कडे कोंबडीने चार पायाच्या पिल्लूला जन्म दिले आहे. सखाराम यांच्या कोंबडीने एकूण 12 पिल्ले जन्माला घातली त्यात एक पिल्लू चार पायाचे आहे. विशेष म्हणजे हे पिल्लू जिवंत आहे. सर्व सामान्य कोंबडीच्या पिल्लांना दोन पाय असतात परंतु या पिल्लाला चार पाय आहे . पिल्लू पाहून शिंदे कुटुंबियांना आश्चर्याचा धक्काच बसला. चार पायाच्या या कोंबडीच्या पिल्ल्याची चर्चा आजूबाजूच्या परिसरात होत आहे. 

Edited By- Priya Dixit