शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (15:51 IST)

भावपूर्ण श्रद्धांजली : माजी खासदार, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पुंडलिक हरी दानवे यांचे निधन

जालना लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार  ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी  तत्वनिष्ठ राजकीय व्यक्तिमत्व पुंडलिक हरी  दानवे यांचे आज सकाळी वयाच्या 95 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजकारणात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना , मुलगी , जावई, नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या वर मंगळवारी 2 नोव्हेंबर ला दुपारी मुळगाव पिंपळगाव सुतार तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे अंत्यसंस्कार केले जातील.