रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (11:49 IST)

फडणवीसांचा नवाब मलिक वर घणाघात ; म्हणाले मी दिवाळी नंतर बॉम्ब फोडेन, नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध

नवाब मलिक यांनी आरोप केला आहे की, 'महाराष्ट्रात ड्रग्सचा सगळा खेळ कुठेतरी देवेंद्रजींच्या आशीर्वादाने सुरू होता आणि सुरू आहे.
महाराष्ट्र सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या आश्रयाखाली  मुंबई, महाराष्ट्र आणि गोव्यात अमली पदार्थांचा व्यापार होत असल्याचा आरोप मलिक यांनी केला. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. नवाब मलिकचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, याचे पुरावे मी मीडियाला देईन, असे फडणवीस म्हणाले.
 
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'नवाब मलिक यांचे आरोप हास्यास्पद आहेत. रिव्हर अँथमसाठी आलेल्या टीमचे फोटो क्रिएटिव्ह टीमच्या सदस्याने काढले होते.4 वर्षांपूर्वीचा हा फोटो आहे. त्या व्यक्तीचा माझ्यासोबत फोटोही आहे. माझ्या पत्नीसोबतचा फोटो मुद्दाम ट्विट केला आहे. कुणासोबत फोटो काढून तो ड्रग माफिया असेल, तर ड्रग्जसह पकडलेला त्याचा जावई काय, त्याचा पक्षाला ड्रग्स माफिया म्हणायचे का ?  आता त्यांनी दिवाळीच्या आधी लवंगी बॉम्ब (छोटा फटाका) लावला आहे, मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडेन.'नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी काय संबंध आहेत, याची पुरावे मी शरद पवार आणि जनतेला देईल," असंही फडणवीस म्हणाले.
 
याआधी नवाब मलिक यांनी आरोप केला होता की, 'महाराष्ट्रात ड्रगचा सगळा खेळ कुठेतरी देवेंद्रजींच्या आशीर्वादाने सुरू होता आणि सुरू आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी. शेवटी देवेंद्रजींचा या शहरातील ड्रग व्यवसायाशी काय संबंध आहे?.
 
नवाब मलिक यांचे फडणवीसांवर मोठे आरोप 
* फडणवीस यांच्या आश्रयाखाली अमली पदार्थांचा व्यापार सुरू होता.
* पेडलर जयदीप राणासोबत फडणवीस यांचे संबंध
* अमृता फडणवीस यांच्या गाण्याला जयदीप आर्थिक मदत करतो
* ड्रग्ज पेंडालरांना वाचवण्यासाठी वानखेडे यांची नियुक्ती
* अनेक भाजप नेत्यांचे ड्रग्ज तस्करांशी संबंध आहेत
* भाजपने माझ्या कुटुंबाला लक्ष्य केले
* माझ्या जावयाला चुकीच्या पद्धतीने अडकविले
* सर्वोच्च न्यायालयाच्या अध्यक्षांची राष्ट्रपतींकडे तक्रार करणार आहे