1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (11:04 IST)

गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार केला,आरोपी पोलिसांच्या ताब्यात

The accused raped the girl by giving her a drugगुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार केला
खाद्य पदार्थामध्ये गुंगीचे औषध देऊन एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना येडेमछिंद्र तालुका वाळवा इस्लामपूर येथे घडली आहे. या प्रकरणात आरोपी अतुल बाजीराव पाटील (42) याला पोलिसांनी आत केली आहे. अतुल पाटील ची पीडित तरुणीशी ओळख होती आणि तो तरुणीकडे येत जात असे. दोन वर्षांपूर्वी आरोपी अतुल हा तरुणीकडे गेला असता तरुणी घरात एकटीच होती. त्याने सोबत बिर्याणी खाण्यासाठी नेली होती त्यात त्याने गुंगीचे औषध मिसळले . तरुणी बेशुद्ध झाल्यावर त्याने तरुणीवर बलात्कार केला. या कृत्याचे फोटो आणि व्हिडीओ त्याने करुन ठेवले होते. ते फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तो तरुणीवर कधी घरात तर कधी लॉजवर नेऊन अत्याचार करायचा. हा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरु होता. वारंवारच्या अत्याचाराला कंटाळून तिने हा प्रकार आपल्या घरी आई वडिलांना सांगितला. आई वडिलांनी आरोपीला खडसावून जाब विचारल्यावर त्याने हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी मुलीच्या आई वडिलांना दिली. मुलीने आरोपीच्या विरोधात तक्रार इस्लामपूर पोलीस ठाण्यात केली. इस्लामपूर पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने दोन दिवसाची कोठडी सुनावली आहे.